बंजारा समाजातील गोरगरीब मजुरांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे वाटप ... वसंतराव नाईक अधिकारी व कर्मचारी संघटना सांगली जिल्हा यांचा स्तुत्य उपक्रम .

बंजारा समाजातील गोरगरीब मजुरांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे वाटप ...
वसंतराव नाईक अधिकारी व कर्मचारी संघटना सांगली जिल्हा यांचा स्तुत्य उपक्रम ...


वसंतराव नाईक अधिकारी व कर्मचारी संघटना सांगली याने समाजातील गोरगरिबांना दिला मायेची आधार ...


सांगली प्रतिनिधी :(जत दर्शन)
    जगामध्ये कोरोना व्हायरस या भयानक महामारीपुढे सर्व देशात फार वाईट स्थिती निर्माण झाली असताना महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज ऊसतोड व रस्त्याची कामे करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात आलेला आहे. या समाजातील सर्व मजुरांचे जीवन हे दररोजच्या कष्टावर अवलंबून असते. दररोज काम केले की त्यांना दोन वेळेची  रोजीरोटी  खायला मिळते .या दररोज कष्टातून कमवलेल्या या पैशातून ते दोनवेळचे  उदरनिर्वाह व आपल्या गावाकडील मुलांचा शिक्षणाचा खर्च यातून करत असतात. पण आज या कोरोणासारख्या महामारीमुळे सर्व मजुरांचे भयानक हाल होताना दिसत आहेत. त्यांना स्थानिक पातळीवर कोणतीही मदत मिळत नाही . दोन वेळच्या अन्नाला हे मजूर महाग झालेली दिसून येतात. या सर्व गोष्टी निदर्शनास आल्यानंतर वसंतराव नाईक अधिकारी व कर्मचारी संघटनेचे सांगली जिल्हा सचिव प्रा. सचिन चव्हाण व जिल्हा सल्लागार सखाराम राठोड यांनी पुढाकार घेऊन संघटनेतील लोकांना आवाहन केले. संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी या आवाहनाला चांगला प्रतिसाद देऊन सांगली जिल्ह्यातील ऐतवडे खुर्द येथे मोलमजुरी करणाऱ्या वीस कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे वाटप करण्यात आले . या सामाजिक उपक्रमांमध्ये वसंतराव नाईक संघटनेचे राज्य अध्यक्ष  अमर राठोड  व उपाध्यक्ष श्री रंगनाथ चव्हाण यांनीही मोलाची अशी मदत केली. वसंतराव संघटनेचे जिल्हा सल्लागार दानशूर व्यक्तिमत्व सखाराम राठोड यांनी मोठ्या प्रमाणामध्ये स्वतः वैयक्तिक एक महिना पुरेल एवढे धान्य धान्य या गरजू लोकांना दिले. सांगली जिल्हा सचिव  प्राध्यापक सचिन चव्हाण यांनीही मोलाची आर्थिक मदत केली. वसंतराव नाईक संघटना सांगली जिल्हा यांचे हे सामाजिक काम पाहून सर्व स्तरातून कौतुक होत आहे .या सामाजिक उपक्रमांमध्ये जत दर्शनचे संपादक व संघटनेचे पदाधिकारी सुरेश राठोड त्याचबरोबर दिलीप राठोड सांगली पोलीस अशा अनेक पदाधिकारी व समाजातील महाराष्ट्रातील अनेक व्यक्तीनी या सामाजिक उपक्रमासाठी खारीचा वाटा उचलला आहे.  या सामाजिक उपक्रमांबरोबर सांगली जिल्ह्यातील सर्व समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपामध्ये सेवा देणार असल्याचे मत जिल्हा सचिव प्राध्यापक सचिन चव्हाण यांनी जत दर्शन शी बोलताना  सांगितले.


Popular posts
पांडोझरी येथे गरजू १०० कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप* (संख प्रतिनिधी-  मिलींद टोणे )
Image
बंजारा समाजातील मजुरांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे वाटप ... वसंतराव नाईक कर्मचारी संघटना सांगली जिल्हा यांचा स्तुत्य उपक्रम ...
Image
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आज जत येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी ...
Image
कुणिकोणुर येथील सर्व गावकरी कुटुंबाना भाजीपाल्याचे वाटप*     अध्यात्माच्या माध्यमातुन समाजकार्य करणारे ह. भ. प. तुकारामबाबा महाराज* येळवी प्रतिनिधी (संजय चव्हाण)
Image