*अध्यात्माच्या माध्यमातुन समाजकार्य करणारे ह. भ. प. तुकारामबाबा महाराज*
* कुणिकोणुर येथील सर्व गावकरी कुटुंबाना भाजीपाल्याचे वाटप*
येळवी प्रतिनिधी (संजय चव्हाण)
आज सारे जग कोरोना या जागतिक महामारीच्या संकटात लोटले असताना. या अस्मानी संकटातुन आपला जतसारखा दुष्काळी पट्टा तरी कसा वाचेल. कष्टकरी जनतेला लॉकडाऊन मुळे जगणे मुश्किल झाले असताना. ह भ प तुकारामबाबा महाराज मात्र गावोगावी जावुन अविरतपणे लोकाना रोजच्या गरजेच्या वस्तुंचे-भाजीपाल्याचे वाटप करत आहेत. ही खऱ्या अर्थाने महाभाग्याची गोष्ट म्हणावी लागेल.
आज कुणिकोणुर, सनमडी व मायथळ येथे ह भ प तुकारामबाबा महाराज यानी येवुन संपुर्ण गावाला भाजीपाल्याचे वाटप केले. लोकानी स्वत: ची काळजी घ्यावी यासंदर्भात लोकाना मार्गदर्शन केले.