कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आज जत येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी ...

जत:प्रतिनिधी. 
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आज जत येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 
याबाबत सविस्तर माहिती अशी की जत तालुक्यातील पोलीस प्रशासन (कोरोना वारियर्स) हे गेली तीस दिवस कोरोनाचा शिरकाव आपल्या जत तालुक्यात होऊ नये यासाठी रात्रीचा दिवस करताना दिसत आहेत.  
आपल्या जत तालुक्याचे सिमावर्ती भागातील कर्नाटक राज्यातील बेळगाव विजयपूर व बेळगाव या जिल्ह्यात कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळून आले आहेत. तसेच शेजारील सोलापूर जिल्ह्यात तर कोरोनाचे चाळीसचे जवळपास रूग्ण आढळून आले असून येथील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रशासन सावध झाले असून. तालुकाप्रशासनाने जत तालुक्यातील सिमावर्ती भागातील कर्नाटक लगतच्या उमदी, संख,जाड्रबोबलाद, माडग्याळ आदी गावामध्ये पाच दिवसाचा लाॅकडाऊन कडक असा पाळला आहे.त्यातून या गावानी एक प्रकारे आपण कोरोणाचा मुकाबला करण्यासाठी सक्षम असल्याचे सिद्ध केले आहे. 
असे असले तरी शेजारील जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जत तालुक्यात लाॅकडाऊनचे कडक अमलबजावणी व लाॅकडाऊनचे उल्लंघन करणारे वर कडक कारवाई केली पाहीजे. हे काम आपले पोलीस बांधव करताना दिसत आहेत.
कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रात येणारे प्रमुख मार्गावर पोलीस प्रशासनाने कडक अंमलबजावणी चालू केली आहे.  
यासाठी पोलीस बांधव रात्रंदिवस आपल्या सुरक्षिततेसाठी त्यांचा व त्यांच्या कुटुंबियांचा जिव धोक्यात घालून केवळ कोरोना या महामारी पासून आपण दूर रहावे यासाठी ते आपली ढाल बनून समोर ऊभे आहेत. पण आपणाला त्याचे गांभीर्य नाही. प्रशासनाचे वतीने आपणाला वारंवार घरातच राहाण्याचे, घरातून अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन करून ही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. व  विनाकारण घराबाहेर पडून कोरोनारूपी बिमारी घरी घेऊन येतो. 
आपण व आपले कुटुंब कोरोनापासून दूर रहावे यासाठी पोलीस बांधव रस्त्यावर आहेत.  
त्यानाही वारंवार कोरोनाचे रूग्णाच्या सानिध्यात रहावे लागते. त्यासाठी त्यांचे आरोग्य ही कोरोनामुक्त असे असले पाहिजे. यासाठी आज येथिल श्री. साईप्रकाश मंगल कार्यालयात जत येथील हिराई मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटल चे डाॅ. झारी, डाॅ.मोगली,  डाॅ. शिंदे यांच्या आरोग्य पथकाने जवळपास दिडशे पोलीस कर्मचारी व अधिकारी यांची आरोग्य तपासणी केली. 
यावेळी जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. दिलीप जगदाळे, पोलीस निरीक्षक श्री. रामदास शेळके, पोलीस उपनिरिक्षक श्री. कत्ते व ईतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.


Popular posts
बंजारा समाजातील गोरगरीब मजुरांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे वाटप ... वसंतराव नाईक अधिकारी व कर्मचारी संघटना सांगली जिल्हा यांचा स्तुत्य उपक्रम .
Image
पांडोझरी येथे गरजू १०० कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप* (संख प्रतिनिधी-  मिलींद टोणे )
Image
बंजारा समाजातील मजुरांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे वाटप ... वसंतराव नाईक कर्मचारी संघटना सांगली जिल्हा यांचा स्तुत्य उपक्रम ...
Image
कुणिकोणुर येथील सर्व गावकरी कुटुंबाना भाजीपाल्याचे वाटप*     अध्यात्माच्या माध्यमातुन समाजकार्य करणारे ह. भ. प. तुकारामबाबा महाराज* येळवी प्रतिनिधी (संजय चव्हाण)
Image