*पांडोझरी येथे गरजू १०० कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप*
संख प्रतिनिधी मिलींद टोणे
जत तालुक्यातील पांडोझरी येथे आज मा. श्री. तम्मण्णगौडा रवि पाटील माजी सभापती जि. प. सांगली, गुरुबसव पाटील( सर) ,चंद्रकांत गुड्डोडगी भाजपा तालुका अध्यक्ष, डॉ. रवींद्र आरळी यांच्या संयुक्त सहकार्याने जत तालुक्यातील पांडोझरी येथे गरजू व्यक्तींना अन्नधान्याचे किट वाटप केले .त्यामध्ये तेल, निरमापावडर, तांदूळ, गहू ,साखर, चहापावडार, आशा आनेक जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असल्याने गोरगरीब आणि कामगार यांच्यासाठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्व कामे बंद असल्याने मोल मजुरी करून आपल्या संसाराचा गाडा चालवणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. घरातील लागणारे अन्नधान्य संपत आले आहे. माणुसकी दाखवत पांडोजरी गावांतील युवा तरूनानी पुढाकार घेत यांनी अन्न धान्यचे किट वाटप केले आहे. यावेळी लोकांच्या गैरसोयीचा विचार करुन पांडोझरी गावात १००गोरगरीब कुटुंबना जीवनावश्यक वस्तुंचे कीट वाटप केले व गरीब लोकांना या व्यक्तीच्या हास्ते सोशल डिस्टन्स ठेवुन किट वाटप करण्यात आले. मा. श्री.कमलाकर कांबळे,सामाजिक कार्यकर्ते श्री. शंकर काखंडकी माजी सरपंच, हणमंत गडदे भाजपा युवा नेते,सुभाष कांबळे RPI अध्यक्ष, आमसीद मासाळ गावाचे पोलीस पाटील, लक्ष्मण काखंडकी गावचे पाटील,भारत माने नाभिक संघ अध्यक्ष,चंद्रकांत पडोळकर युवा नेता, अक्षय सगरे,मनोहर कांबळे ,रामू चव्हाण,दावल मुल्ला,प्रकाश माने,मनसे विद्यार्थी सेना संगटक सागर माने, रमेश कांबळे,मलकु बिराजदार, श्रीकांत बाबानगर,सुरेश क्षिरसागर मनसे विद्यार्थी सेना विभाग प्रमुख ,धर्याप्पा बिराजदार, सुरेश पाटील, श्रीकांत कदम, देवराज कांबळे,सुरेश पाटील, निंगाप्पा काखंडकी,यल्लाप्पा कांबळे, संतोष धा.कांबळे.जयवंत गडदे,आप्पु गडदे शिवाक्का शिंदे, सरस्वती माने, काशीबाई गडदे, लालनबी मुल्ला,मायाक्का पुजेरी ,सचिन गडदे, रविंद्र चव्हाण, आदी उपस्थित होते.