संख प्रतीनिधी -- राजेभक्षर जमादार
बसवराज पाटील यांच्याकडून 500 जिवनावंश्यक किट व 5000 मास्क वाटप
कोरोना विषाणू मुळे राज्यभरात लॉकडाउन असल्यामुळे लोकांना जिवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडता येत नसल्याचे लक्षात घेत संख येथील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा राजाराम बापू पाटील जुनियर कॉलेजचे संस्थापक मा.श्री बसवराज पाटील (काका) व प्राथमिक आरोग्य केंद्र संखचे डॉ.सुशांत बुरकुले,दयगोंडा बिरादार ,सुभाष पाटील या सर्व मान्यवरांच्या हस्ते 500 किट वाटप करण्यात आले.कोरोना संसर्गजन्य रोग थैमान घातल्याने व संचारबंदी 144 कलम लागू करण्यात आले आहे.
यामुळे गरीब लोकांना काम केल्याशिवाय पोटची खळगी भरत नाही लोकांच्या दैनंदिन जिवनाचे विचार लक्षात घेऊन 500 गोरगरीबाना तसेच 11 आशा वर्कर यांना हि जिवनावंश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.तसेच गावात 5000 मास्क वाटप करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा संस्थेचे संस्थापक बसवराज पाटील , निलाबिंक शिक्षण संस्था राजारामबापू पाटील व जुनिअर कॉलेजचे व्हाईस चेअरमन सुभाष! पाटील ,जत कृर्षी बाजार समिती सभापती दयगोंडा बिरादार प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.बुरकुले, संख गावचे पोलीस पाटील सुरेश पाटील ,रामगोंडा बिरादार,बसया मठपती,प्राचार्य कन्नुरे सर, जतचे पत्रकार दिनराज वाघमारे,किरण जाधव ,बादल सर्जे ,तसेच संखचे पत्रकार रियाज जमादार ,राजू पुजारी ,राजेभक्षर जमादार ,रामण्णा सनोळी,व शाळेचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
.